तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कांही वस्तू बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कांही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात ते पिंगपॉंगचे बॉल भरू लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी बारिक खड्यांचा बॉक्स रिकामा केला. आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी ताबडतोब हो म्हटलं. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी एका आवाजांत होकार भरला. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले दोन कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले.वाळूमध्ये जी कांही जागा होती ती वाळूने पूर्ण भरून निघाली. सर म्हणाले,"आता ही जी बरणी आहे तिला आपले आयुष्य समजा. पिंग पॉंगचे बॉल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडिचे छंद - ह्या अशा गोष्टी आहेत की तुमच्याकडलं सारं काही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपूर्ण असेल. दगड, खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर आणि कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी.
"आता तुम्ही प्रथमच बरणीमध्ये वाळू भरलीत तर पिंगपॉंगचे बॉल किंवा खडे यांच्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ति लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वांच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच राहणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी महत्वाचं काय आहे त्याकडे लक्ष द्या.
"आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअपसाठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेऊन बाहेर जेवायला जा. घरची सफाई करायला आणि टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमीच वेळ मिळत जाईल.
"पिंगपॉंगच्या बॉलची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायच ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे. "
सरांचं बोलून होताच एका एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं - "यांत चहा म्हणजे काय ?"
सर हंसले नि म्हणाले - "बरं झालं, तू विचारलस. तुझ्या प्रश्नाचा अर्थच असा की आयुष्य कितीही परिपूर्ण वाटलं तरी मित्राबरोबर एक-दोन कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते."
आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर हा विचार वाटून घ्या. मी तर आत्ताच केलं ते. "
Tuesday, October 13, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment