होमियोपॅथीमधील एक विरोधाभास
होमियोपॅथीच्या तत्वाप्रमाणे, औषध जेव्हढे विरल ( dilute ) कराल, तेव्हढे ते अधिक परिणामकारक (potent ) होत जाते. आता गंमत काय होते … कोणतेही द्रावण ( solution ) एका मर्यादेपलीकडे विरल करता येत नाही. कसे ते पहा … एक होमियोपॅथीच्या मात्रेमध्ये, जे संयुग, गुण आणते, त्याची संख्या अमुक आहे असे समजा. विरल करता करता, एक अशी स्थिती येते की जेव्हा, त्या मात्रेमध्ये, संख्येने केवळ एकच संयुग उरते. होमियोपॅथिचा समज जर ग्राह्य धरला, तर ही मात्रा त्या औषधाची सर्वांत प्रभावी मात्रा असायला हवी. ही मात्रा जर आणखी, समजा दुपटीने विरल करण्याचा प्रयत्न केला, तर एका मात्रेत, संख्येने एकच संयुग राहील तर दुसर्या मात्रेत एकही संयुग राहाणार नाही. संख्येने एक असलेल्या संयुगाची (molecule ) आणखी विभागणी होऊ शकत नाही. त्याचे विघटण अणुंमध्ये होऊ शकते. व अणुंमध्ये मूळ संयुगाचे गुणधर्म नसतात. तसेच, एखाद्या मात्रेमधील संयुगांची संख्या मोजणे हे जवळ जवळ अशक्यप्राय आहे. आता बोला .....
Wednesday, October 28, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
होमिओपॅथीचे तत्त्व यामुळे खोटे ठरत नाही. औषधाचे Concentration कमी करण्याला एक अंतिम मर्यादा आहे इतकेच. Microfining मुळे औषधाचा परिणाम जास्त चांगला मिळतो असे इतरहि शास्त्रे मानतात. आयुर्वेदिक औषधांमध्येहि मात्रा बनवताना दीर्घकाळ खल चालवून Microfining चाच उपयोग केला जातो. Microfined Aspro जास्त उपयुक्त अशी जाहिरात पाहिलेली आठवते.
Post a Comment