Tuesday, October 20, 2009

कांही विचार ( संग्रहीत )
*** सर्वेपि सुखिन: …
सर्वांना सुख प्राप्त होवो. सर्व निरोगी होवोत. सर्वजण शुभ पाहोत. कोणालाही दु:ख न होवो.
*** असतो मा …
( हे ईश्वरा ) तू मला असत्याकडून, सत्याकडे घेऊन जा. अज्ञानरूपी अंध:कारापासून, ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जा. मृत्युपासून अमरत्वाकडे घेऊन जा.
*** ओम पूर्णमद: …
ते ( परब्रम्ह ) पूर्ण आहे. हे ( जगसुद्धा त्या परब्रम्हामुळे ) पूर्ण आहे. ( हे ) पूर्णत्व ( त्या ) पूर्ण ( परब्रम्हा ) पासून उत्पन्न झाले आहे. त्या पूर्णातून पूर्ण काढून घेतल्यानंतरही पूर्णच शिल्लक रहाते.
*** आसिंधुसिंधुपर्यंता …
सिंधु नदीपासून सिंधु अर्थांत हिंदी महासागरापर्यंत पसरलेल्या या देशांतील जो मनुष्य ही आपली पितृभूमी व पुण्यभूमी मानतो तो हिंदू होय.

No comments: